३ ढाकचा भैरी

* असेच एकदा ३१ मे रोजी लोणावळ्या जवळ एक दिवसाच्या राजमाची व ढाकच्या ट्रेकचे आयोजन केले होते. वर्तमानपत्रा ट्रेकची जहिरात दिली. सकाळच्या ६ च्या लोणावळा लोकलने निघालो, त्यामध्ये काही जण पुणे रेल्वे स्टेशनवर,तर काही तळेगावला चढले  व लोणावळ्यात एकूण ४६ जण गोळा झाले.

राजमाची

वाट माहिती असलेले बरोबर दोघच प्रसाद काशिकर व सचिन जोशी. राजमाचीहून ढाकच्या भैरीला जाताना वाटेत पाणी नव्हते, त्यात दुपारी काहीजण करवंदाच्या जाळीत घूसले, ऊशीर झाला. ढाकच्या गुहेत जाण्यासाठी वेलीला धरून जावे लागते. ही वेल दर वर्षी दसर्ऱ्याच्या/ पाडव्याच्या दिवशी बदलली जाते.

वेलीची वाट

ढाकची गुहा

ढाकच्या गुहेत पाण्याच्या टाक्यात स्वयंपाकासाठी भांडी आहेत. वापरून धूवून परत टाक्यात ठेवायची.

मग प्रसादने परत लोणावळ्यात जाण्याऐवजी पलिकडे वधप गावात ऊतरुन एसटीने कर्जतला जायचे ठरवले. कसेबसे आम्ही २०-२२ जण वधपमधून रात्री ८ च्या एसटीने कर्जतला पोहोचलो. दुसरी ९ वाजताची मुक्कामी एसटी होती, त्यामुळे उर्वरीत सर्वजण वधपमध्ये एका शाळेतल्या शिक्षकांच्या घरी पिठलं भात खाउन थांबले होते.

मग मी व श्रीरंग जवळगीकर कर्जतला स्टेशन बाहेर पानपट्टीवर नाना म्हामुनकर नावाच्या व्यक्तीला भेटल़ो, रात्री कर्जत टेलीफोन एक्सचेंज मधून पुण्यात आ्ँफीसला फोन करून सगळे सूखरूप असल्याचे व आम्ही दुसऱ्या दिवशी येत असल्याचे कळविले. मग रात्री नाना म्हामुनकराच्या मित्राच्या ट्रकने वधप गावातून राहिलेल्या सर्वांना कर्जतला आणले. सकाळी  कर्जत लोकलने पुणे गाठले.

Comments

Popular posts from this blog

४ राजगड ते शिवथरघळ

५ वरंध घाटात कँम्पींग