१- माझी भटकंती
।।श्री।।
सध्या सुरू असलेल्या करोना लाँकडाउनच्या सुट्टीत, नितीनने सूचविल्या प्रमाणे अत्ता पर्यंत झालेल्या ट्रेक बद्दल लिहायचे ठरवले खरे, पण नेमकी सुरवात कशी करावी ते कळेना. मला तूमच्या सारखे लिहणे अवघड आहे, पण मी अत्ता पर्यंत झालेल्या ट्रेक/भटकंती मधले माझे अनुभव, आठवणी किंवा घडलेले गंमतीशीर किस्से तुमच्या बरोबर शेअर करतो.
मला लहाणपणी पाठीच्या दुखापती मुळे कोणत्याही साहसी खेळ किंवा अन्य अँक्टीविटी करण्यास बंधनं होती. त्यामुळे
मी ट्रेकींगला जायला लागलो ते १९८५ मध्ये दहावी नंतर, माझ्या शळेतला वर्ग मित्र शन्या /केशव जोशी मुळे. शनिपारा जवळ त्याची श्री. शिवदुर्ग प्रतिष्ठान नावाची एक संस्था होती, म्हणजे आँफीस होते. प्रत्यक्षात सगळेजण संध्याकाळी ना. सी. फडके चौकात उध्यान प्रसाद कार्यालया समोरच्या ग्राऊंडवर व्यायामासाठी जमायचे.
१९८५-१९८८<br>
केशवच्या ह्या संस्थे मार्फत पदभ्रमण चालू झाले ते राजगड पासुन. त्या वेळेस इथे अनेक नविन मित्र झाले, त्यातला एक प्रसाद काशिकर मूळचा कल्याणचा पण फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये नोकरीत. हा वेगवेगळ्या ठीकाणी ट्रेक न्यायचा.
* दर 15 आँगस्टला शिवथरघळला जायचे, वरंधा घाट उतरल्यावर वरंध गावात एक टपरीवजा छोटे हाँटेल मध्ये पुरी-भाजीचा नाश्ता व बरोबर मालकाची - मामाच्या (वेलांटी/पावणेआठ) फूगलेली पुरी गाण्याची करमणूक..
* मी आणि शन्या एकदा द़ोघेच राजगडला निघालो घरी सांगितले होते की इतर मोठे, संतोष काळे वगैरेही बरोबर आहेत. पण नेमका संतोष बाबांना मंडईत भेटला, त्याच्या लक्षात आली गडबड त्याने सांगितले की दुपारच्या एसटीने जाणार आहे. मग राजगडहून आल्या नंतर आमची घरी व संतोष च्या रूमवर चांगलीच कानउघाडणी झाली.
* मी शन्याव त्याचे दोन मित्र मंगेश जोशी आणि अनिल रायबागी एकदा ५ दिवस शिवनेरी, कुकडेश्वर,जीवधन- णाणेघाट, चावंड, हडसर, हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला गेलो होतो.
अनिलचा पहिलाच ट्रेक, तो जरा स्थुल होता, जाम दमलेला पण त्याला पुर्ण करायला लावला. ह्यात चावंडहून लाँचने पलीकडे हडसरला गेल्यावर एका घरातून भाकरी करुन घेतल्या, तेव्हड्यात मंगेशला पायाला एक कुत्रे चावले, झाले तो परत निघाला दुपारच्या एसटीने. पुढे हडसर किल्ल्यावरुन पलीकडे खाली उतरायला कातळावर पहारी ठोकून खुटीची वाट केली आहे. ही उतरताना अनिलची फार पंचाईत झाली, वर खूटीला पकडले की खाली पाय टेकायचे नाहीत.
खुटीची वाट
मग त्याला माझ्या व शन्याच्या मध्ये घेतला, म्हणजे शन्या अधी थोडा खाली उतरला की मग अनिल त्याच्या खांद्यावर पाय ठेवून, वर माझ्या पायाच्या अधार... असे खाली उतरल़ो. पेकलेल्या अवस्थेत परत शिवनेरी एसटी स्टँडवर पोहचलो, दुपारी ४ ची पुणे गाडी लगली होती, खचाखच भरलेली- शेवटी अनिल चक्क रडून हया एसटीत घुसला. नंतर शन्या शिवनेरीला एकटा जाऊन आला. मग आम्ही दोघे संध्याकाळी ७ च्या एसटीने पुण्यात परतलो व रात्री डेक्कन वर नटराजच्या इथे भूर्जी खायला पैसे लागणार म्हणून शिवाजीनगर पासून घरी चालत गेलो.
* एकदा आम्ही जीवधन- नाणेघाट ट्रेकला जायचे ठरवले, तेव्हा एलप्रो कंपनी मधले सूनिल करंदीकरचे 3 मित्रांना स्वयंपाका साठी लागणारी भांडी आणण्याची जबाबदारी दिली होती, कारण आम्हाला भांड्यांचे ओझे व्हायचे नव्हते. रात्री नाणेघाटाच्या गुहेतं जेवायची तयारी सुरू झाली, प्रत्येकाने बरोबर आणलेले डाळ,तांदूळ, कांदे-बटाटे,पापड सर्व जिन्नस काढले.. आणि सुनील च्या मित्रांने ६ जणांच्या स्वयंपाका साठी आणलेले बारके चहाचे भांडे - मग काय रात्री ११ वेळेस खिचडी केली, एकीकडे बरोबरचे १०० पापड संपले पण जेवण काही ऊरकेना...
🚩नाणेघाट ( जुन्नर )
सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे आहेत.
Comments
Post a Comment