५ वरंध घाटात कँम्पींग

* १९९३ मध्ये मी व माझा मित्र निरंजन देशमुख (भारती वाधापिठात प्रोफेसर) यांनी वरंध घाटात हिरडोशीपाशी रस्त्या जवळ पाण्या पलिकडे कँम्पींग करायचे ठरवले.

कँम्पींग साईट


मी नुकताच शावाजीनगर शाखेत अस्तांना अमेरिकेहून येणाऱ्या मित्राला म्हणजेच गिरीश देसाईला टेंट आणायला सांगितला होता. निरंजननी इटलीहून रबर बोट आणली होती. 


निरंजन एक नंबरचा खवैया आणि ऊत्तम कूक. सगळी तयारी झाली निरंजनच्या फियाट मध्ये सर्व सामान आईस बॉक्स, छोटा कुकर, मटण वगैरे…


ऐत्या वेळेला निरंजनच्या धाकट्या भावाने आनंदने हट्ट करून आमच्या बरोबर यायचे ठरवले. प्लँन नूसार दोघच जायचे ठरले असल्याने निरु तयार नव्हता, शेवटी आनंदने सर्व एकट्याची तयारी घेतली (म्हणजे भोर मध्ये वेगळे १/२ कि. मटण घ्यायला लावले त्याला म्हणून त्याने विचारले "दादा तू कोण आहेस माझा? कसा वागतोयस माझ्याशी"


संध्याकाळी टेंट पीच केला, स्वयंपाक केला मस्त जेवलो आणि गप्पा मारत बसलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी

रब्बर बोट

रात्री ११.३० च्या दरम्यान समोरच्या वस्तीवरील लोक येऊन चौकशी करून गेले. पहाटे ३-३० च्या आसपास अचानक एक धोतर नेसलेला खेडूत आला, टरकलीच ऊतरली पूर्ण... तो बसला बोलला तंबाखू खल्ली आणि गेला आड वाटेने.

सकाळी ऊशीरा उठलो पोहल़ो व संध्याकाळी मुक्कामास शिवथरला साळुंखे…


Comments

Popular posts from this blog

४ राजगड ते शिवथरघळ

३ ढाकचा भैरी