४ राजगड ते शिवथरघळ
बालेकिल्ला राजगड :

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत.

बालेकिल्ल्याला साधारण १५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. विशिष्ट अंतरावर बुरुजही आहेत. आत गेल्यावर समोरच जननी मंदिर आहे. पुढे गेल्यावर चंद्रतळे तळ्याच्या समोरच उत्तरबुरुजा पासून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून बालेकिल्ल्यावर येणारी पायवाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते तोच "उत्तर बुरुज". इथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

*१९९१ ते १९९३ याच काळात राहूल जोशी मुळे महाबळेश्वरच्या सुहासची ओळख झाली.

मध्ये मी, सुहास व नितीन राजगड ते शिवथरघळ गोप्याच्या घाटातून गेलो. ह्या वेळेस एक ग्रुप सिंहगड ते राजगड आला होता. विषेश म्हणजे एक काळ्या रंगाचे कुत्र आमच्या बरोबर शेवटपर्यंत आले. राजगड उतरुन ढेब्याची वाडी नंतर निगडे गावाच्या नदिच्या पूला अलिकडे आम्ही मँगी खाल्ले आणि पुढे निघालो, तर एक काळी सावळी बाई आम्हाला भेटली. तिने आम्हाला रस्ता दाखवला आणि ती पुढे दिसेनाशी झाली.

हनवती भिकुले कुटुंब
Comments
Post a Comment