२ ट्रान्स कॉस्टल वे मोहीम
* १९८७ साली मी बारावीला होतो तेव्हा प्रसाद काशिकरने ट्रान्स काँस्टलवे मोहीम केली, अर्थातच आम्हाला परवानगी नव्हती. समुद्र किनाऱ्यावरील एकुण ४0 सागरी किल्ले रोटेशन पध्दतीने, ११ दिवस एक ग्रुप चालणार त्यातले काहीजण रिप्लेस व्हायचे व ठराविक जण पुर्ण चालणार होते.
* १९८८-८९ सि.ऐ. विधाधर भिडे व मिलिंद घाणेकरां कडे जॉब केला. १९९०-१९९२ मेडिनोव्हा मध्ये अकौंट अँसिसटंट म्हणून जॉब मिळाला, नंतर १६ मार्च १९९२ मध्ये जनता बँकेत रूजू...
* १९९५-९६ दरम्यान ताम्हिणी घाट होण्या पूर्वी, आनंद पाळंद्यांचे मोठे बंधूंच्या सांगण्यावरून, मी, प्रसाद काशिकर PWD च्या प्रभूदेसाई, योगेश इनामदार बरोबर पाहणीसाठी शेवत्याचा घाट उतरून मढे घाट चढून यायच ठरल.
म्हणजे तोरण्याच्य मागच्या बाजूला एसटीने भोर्डी गावी मुक्कामी जायचे, आणि चढून वर गुगूळशी- धनगर वाडीच्या उजव्या बाजूस हिंदोळा नावाचा टेहेळणीचा दूर्ग पार करून शेवत्याचा घाट उतरायचे.
वाटते रामदास स्वामींनी वास्तव्य केलेली रामघळ लागते. खाली आल्यावर समजले शिवथरघळला जाता येते मग मी आणि ईनामदार बारसगाव मार्गे संध्याकाळी मुक्कामास शिवथरला साळुंखे...
*१९८९ मध्ये कॉलेजची ट्रीप शिवथरघळला नेली होती.
याच बरोबर पुणे माऊंटेनिअर आणि श्री. शिवदुर्ग प्रतिष्ठान बरोबर दर रविवारी सिंहगडला जातांना कधी कधी बाळू साठी दूधाच्या पिशव्या नेल्या.
* मध्येच मी व शन्या एकदा राजमाचीला गेलो, तेव्हा आमच्या बरोबर पुण्यातील कर्वे रोडवरील राहणारे माझे मित्र प्रविण, प्रदीप गोखले व सलील,समीर अपटे होते इतकेच आठवतय...
*१९८९-९० मध्ये पुरंदरला ट्रेक नेला होता- तेव्हा तिथे पुरवीचा राजगडचा किल्लेदार सुतार भेटला. किल्ल्यावर मिल्ट्री कँप असल्याने फक्त अंडी मिळाली, हा सुतार नेमका माळकरी त्यामुळे त्याने एक पातेले दिले, बाहेरच्या चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी. आमच्या जवळ फक्त रसना सरबताची काही पाकिट, आणि वाटेत पाडलेल्या थोड्या कैऱ्या शिल्लक होती, मग काय भात लावला - रसना, कैरीच्या फोडी व उकडलेली अंडी. इथे एक सोनबा धनगर हाताच्या तळव्याच्या ठशावरुन औषध द्यायचा.
Comments
Post a Comment